फताड्या पायाचा दिवस
करतोय विचार सारासार
रात्र बसलीय कुढत
आरसपानी आरपार
झाड झाड चाल्लय वाळून
जलवाहिन्या निपचित
साल साल खंगलीय किती
रसवाहिन्या गपगार
गवताची कापणी झालीय
उरापर्यंत गळ्यापर्यंत
अंधार पोहोचलाय खोलवर
मूलाधार चक्रापार
ओढला पाहीजे आपला गाडा
जोमानं आता जोरशोर
अंगचोर बैल पडलाय सैल
झालाय फार कामचोर
थांबून कसे चालेल आता
सोडले पाहिजे घरदार
व्हायला पाहिजे हा ओढा
ती नदी तो समुद्र पार
पार व्हायलाच पाहिजे ते मैदान
तो डोंगर ते पठार
- महेश
निद्रानाशाची रोजनिशी/ ड्राफ्ट १
No comments:
Post a Comment