Monday, August 26, 2013

लै झालाय पसारा

सचोटीने जगण्याच्या साध्या क्षणांचा
वाढवत राहिलो गुंता
त्यांचे सण उत्सव करू लागलो

केलेल्या गोष्टी कमी झाल्या न केलेल्या वाढल्या
स्वत:शी वाद मिटण्यापूर्वीच
जगाशी भांडू लागलो

आनंद झाल्यावर खळखळायचे मोकळेपणाने
दु:खात रडून निरभ्र व्हायचे
गेलो विसरून हळूहळू

तहान लागली की प्यायला
भूक लागली की खायला पाहिजे
इथपासून बरेच पुढे आलो

किती किती उसवलोय, आता सावरायला पाहिजे
लै झालाय पसारा
आवरायला पाहिजे


- महेश
निद्रानाशाची रोजनिशी / ड्राफ्ट १


No comments:

Post a Comment