सुटाबुटातला जंटलमन
असतील फळांच्या
दुकानात हातबॉंब्स
अन टेनिस रॅकेटमध्ये मशिनगन
अन टेनिस रॅकेटमध्ये मशिनगन
म्हणून गुप्तचरयंत्रणा
स्वत:ची
स्वतंत्रपणे डोळे दोन
भिरभिरले पाहिजेत म्हणतोय
तीनशे साठ अंशाचा कोन
हालचालींकडे बारीक
लक्ष
ठेवून चोवीस तास सबर
मग सगळ्या बेवारस
वस्तूंची तुम्ही
ठेवालच म्हणा खबर
घराबाहेर पडलेलं
प्रत्येक पाऊल अगदी जपून
भू-सुरूंगांच्या
भितीने अलगद
नसता जाल बर फुकाचे खपून
खिडक्या दारे ठेवालच
बंद
ठेवा प्रवेशबंद वारा
की करता तुमची बॉर्डर सिल
की करता तुमची बॉर्डर सिल
ठेवता घराभोवती खडा पहारा?
- महेश
निद्रानाशाची रोजनिशी/ ड्राफ्ट १

No comments:
Post a Comment