कुणाला वाळीत टाकायचे
कुणाला वाळवंटात
कुणाकडून ओवाळून
घ्यायचे
ठरवून घेतले
कुणाची दुकाने चालू
द्यायची
कुणाला तिर्थयात्रेला
पाठवायचे
कुणाला निरोप द्यायचे
यादी केली
कुणाला खेटायचे
रेटायचे
कुठपर्यंत चालायचे कुठे बसायचे
मुक्काम निश्चित केले
कुणाची गाथा तरणार
कुणाला दर्शन
साक्षात्कार होणार
मनात त्यांची
रांग केली
उभे अठ्ठावीस आडवे
केले
त्यांवरील प्रावरणे
झटकली
दूर केली
उगवतीचे हिशोब
मावळतीपर्यंत नेले
प्रत्येक सूर्य
प्रदक्षिणेचा धूर केला
रस्ता मक्रूर
केला
चंदनाचा गंध लावून
पितांबर नेसून
कमरेवर हात ठेवून
हवं तिथे जात राहिलो
डोळे झाकून
वर्षानुवर्षे
विटेवर उभारण्यांचं
नाटक करत
सगळं लख्ख
पहात राहिलो
- महेश
निद्रानाशाची रोजनिशी / ड्राफ्ट १
No comments:
Post a Comment