म्हटले तर ट्रेन गती
पकडणार असते
- महेश
निद्रानाशाची रोजनिशी / ड्राफ्ट १
आपणही धावत राहणार
असतो
म्हटले तर आपण एका
जागी
स्थिर बसलेले असतो
म्हटले तर
क्षणाक्षणाला खिडकीतून
बदलणार असते चित्रचौकट
म्हटले तर आपल्याभोवती
तीच पृथ्वी
तेच आकाश कायम राहणार
असते
म्हटले तर आपण
सर्वांबरोबर प्रवास करणार असतो
एकत्र गप्पाही मारणार
असतो
म्हटलो तर आपण एकटेच चालणार
असतो
स्वत:शी बोलत स्वत:चाच
हात धरून
म्हटले तर काही काळानंतर
आपण
आरक्षित केलेल्या
जागेवरचा हक्क सोडणार असतो
म्हटले तर ट्रेन
थांबणार नाही असे मानून
आपण फिरकूही देणार
नसतो आपल्या जागेजवळ कुणाला
म्हटले तर झाडे माणसे
घरे गाव गुरे सगळ्या गोष्टी
आपण मागे टाकत जाणार
असतो
म्हटले तर आपण यांना
सोडून कुठेही जाणार नसतो
किंवा बरोबरच घेऊन चालणार
असतो
म्हटले तर आपल्याला
चाकांच्या खडखडाटाचा
त्रास होणार असतो खूप
म्हटले तर आपल्याला
त्यातून
आपले गाणे ऐकू येणार
असते
म्हटले तर आता आपण
उतरणार असतो
कुठल्यातरी स्टेशनावर
म्हटले तर आपल्या
पायाखाली
नवे रूळ येणार असतात
म्हटले तर हे सगळे
आपल्याला लांबवता येणार असते
म्हटले तर थांबवताही
- महेश
निद्रानाशाची रोजनिशी / ड्राफ्ट १
No comments:
Post a Comment