खूप खरवडू नये कुठल्याच गोष्टीचा पृष्टभाग
हमखास बक्षिसाची अपेक्षाही करू नये स्क्रॅच-अॅंड-विन सारखी
बांधावे जन्मजात कुतूहल रूटीनच्या मजबूत खांबाला अन
अडकवावा गळ्यात त्याच्या हळूहळू गमावलेल्या कातडीचा पट्टा
ज्यांना भय छेडते सतत कृष्णविवरातल्या एकांत वाटचालीचे
त्यांनी घासू नयेत लोकांचे चेहरे, ना स्वत:भोवतीच्या भिंतींचे रंग
धीराचे वळावेत कासरे दोर हिंमत बांधावी करकचून पाठीवर
अन्यथा डोकाऊ नये खूप स्वत:च्याही आत, दृष्टीआड ठेवावे अंत:पूर
नसेल खोल दमसास तर वरचेवर तरंगावे खोलवर मारू नये सूर
कुणाच्याही नाकातोंडापासून पाणी तसे कधीच नसते फार दूर
(‘मौज’ दिवाळी २०१३)