Thursday, July 25, 2013

जीवघेणा जीवलग

मी आभाळ पसरलेले असते
मुठीत गच्च धरलेल्या जीवावर
अन दिवस मोजलेला असतो
अस्वस्थ पापणीच्या टोकावर

मी त्याचा स्पर्श झालेल्या जागा खोडून
गोंदून घेतलेले असतात नवे शहारे
आणि त्याचा चेहरा विसरण्यासाठी
पाहिलेले असतात हजारो चेहरे

तरीही त्याचे डोळे मी पहात असतो सर्वत्र
आणि मला उमजू लागलेले असतात
अंधारातील आवेग, दिसू लागलेले असतात
सलगीच्या प्रयत्नातील आंधळे मोर

मला जाणीव असतेच
आपल्या चालीतील तोकडया वेगाची
आणि माहितीही असते लख्ख
उजेडाच्या सहस्त्रनाम स्तोत्राची निरूपयोगिता

हरवून जाण्याची सुप्तेच्छा जादू दाखवतेच
अंदाज असतोच, जाणार आहे मी
त्याच्याच प्रभावक्षेत्रात
मी कुठेही जायचे ठरवले तरीही.

त्याच्या झडपेची कल्पनाही आलेली असते मला
तरीही चालू माझी दूर धावण्यासाठी लगबग
रात्रीच्या वाटेवर दबा धरून कायम
बसलेला असतोच जीवघेणा जीवलग


- महेश
निद्रानाशाची रोजनिशी/ ड्राफ्ट १

No comments:

Post a Comment