सिग्नलचा एक डोळा
झालाय लाले लाल
मिचकून
मिच
कून
अचानक थांबतायत येऊन
एकामागे एक गोलगोल टायर्स
सुरक्षित अंतराच्या सिमारेषा पार करत
ब्रेकनंतरच्या कर्कश्श घर्षणात
ट्रॅफिक हवालदाराची शिट्टी
झालीय हवालदिल
घरातून निघाल्यापासून
लेनची शिस्त
मारत फाटयावर सुसाट
झेब्रा क्रॉसिंगवर येऊन थांबलय
आख्ख्या शहराचं उताविळपण
करत गुर्रर्र गुर्रSS
समोरच्या हेल्मेटवरून टपावरून
गाडीतील थंड हवेतून बाहेरच्या गरम हवेत
नजर टाकतायत लोक
बघताहेत एका विस्कळीत रांगेला
मिळालेला हिरवा मोक्ष
व्रूम व्रूम व्रऊम्मSSS
छातीचा भाता धडाडतोय
आता हा रस्ता आपला उरला नाही आता हा
रस्ता आपला उरला नाही आता हा रस्ता आपला
उरला नाही आता हा रस्ता आपला उरला
नाही आता
हा रस्ता
ओलांडायचा तर वाटतंय वेगात
होईल जमीनदोस्त
आपली हस्ती
जशी
चौपदरीकरणात
वस्ती
झालाय लाले लाल
मिचकून
मिच
कून
अचानक थांबतायत येऊन
एकामागे एक गोलगोल टायर्स
सुरक्षित अंतराच्या सिमारेषा पार करत
ब्रेकनंतरच्या कर्कश्श घर्षणात
ट्रॅफिक हवालदाराची शिट्टी
झालीय हवालदिल
घरातून निघाल्यापासून
लेनची शिस्त
मारत फाटयावर सुसाट
झेब्रा क्रॉसिंगवर येऊन थांबलय
आख्ख्या शहराचं उताविळपण
करत गुर्रर्र गुर्रSS
समोरच्या हेल्मेटवरून टपावरून
गाडीतील थंड हवेतून बाहेरच्या गरम हवेत
नजर टाकतायत लोक
बघताहेत एका विस्कळीत रांगेला
मिळालेला हिरवा मोक्ष
व्रूम व्रूम व्रऊम्मSSS
छातीचा भाता धडाडतोय
आता हा रस्ता आपला उरला नाही आता हा
रस्ता आपला उरला नाही आता हा रस्ता आपला
उरला नाही आता हा रस्ता आपला उरला
नाही आता
हा रस्ता
ओलांडायचा तर वाटतंय वेगात
होईल जमीनदोस्त
आपली हस्ती
जशी
चौपदरीकरणात
वस्ती
- महेश
निद्रानाशाची रोजनिशी/ ड्राफ्ट १
No comments:
Post a Comment