Saturday, July 13, 2013

पाऊस कोसळे चिंब...

पाऊस कोसळे
चिंब
थेंबात विरघळे
बिंब

पाण्यात सोडली
नाव
मग धावून आला
गाव

पक्ष्यांची भिजली
गाणी
देवळात गोठले
पाणी

नभांत पाहिला
घोडा
मग दिवस राहिला
थोडा

चिखलात रोवले
पाय
अन बोलवे घराला
माय


- महेश
निद्रानाशाची रोजनिशी/ ड्राफ्ट १

No comments:

Post a Comment